🕒 1 min read
नवी दिल्ली : जसप्रीत बुमराहचा यॉर्कर बॉल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या चेंडूवर बूम बूम बुमराहने विकेट घेतली आणि टीम इंडियाला विजयाच्या जवळ नेले. बुमराहच्या याच धोकादायक यॉर्कर चेंडूचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्याच्या इराद्याने दौऱ्यावर आहे. सेंच्युरियन येथे पहिली कसोटी खेळली जात आहे. गुरुवारी सामन्याचा पाचवा दिवस असून, तिथे टीम इंडियाची पकड मजबूत दिसत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात बुमराहने अचूक यॉर्कर टाकला. केशव महाराज या यॉर्करचा बळी ठरला. चेंडू कधी विकेटवर आदळला हे त्याला देखील कळले नाही. बुमराहचा हा चेंडू दिवसातील शेवटचा चेंडू ठरला.
True meaning of "ANOTHER ONE BITES THE DUST" ????????#Burmah #INDvsSA #Yorker pic.twitter.com/CfDnKASYJr
— ɯlse (@pitchinginline) December 29, 2021
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात चार विकेट गमावल्या आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला आता विजयासाठी 6 विकेट घ्यायच्या आहेत. दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी 211 धावांची गरज आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांच्या आधारे टीम इंडिया येथून स्पष्टपणे विजयी होताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्याचं कुटुंबप्रमुख असलेलं मायबाप सरकार खरचं आपली जबाबदारी निभावतय का?’
- नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत याचं पोलिसांनी भान ठेवायला हवं- प्रविण दरेकर
- “…तर महाराष्ट्रालाही कठोर निर्णय घ्यावेच लागतील”,शिवसेनेचा इशारा
- महात्मा गांधींबद्दल ‘ते’ वक्तव्य आले अंगलट; कालीचरण महाराजांना अटक
- नसिरुद्दीन शाह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचे टीकास्त्र; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
