पुणे- जगावर सध्या कोरोनाचे सावट आहे. यातच आता पावसाळा देखील सुरु झाला आहे.या काळात तब्ब्येतीकडे दुर्लक्ष करणे चांगलंच महागात पडू शकते .म्हणूनच आम्ही आमच्या वाचकांसाठी काही आरोग्य वर्धन करणाऱ्या काही टिप्स देत आहोत.
विविध औषधीवनस्पती,पदार्थ याबद्दल आम्ही नेहमीच आपल्यासमोर उपयुक्त अशी माहिती आणत असतो.आज आपण रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी याची माहिती करून घेणार आहोत.
आपल्या शरीरातील इम्यून सिस्टममुळे आपलावेगवेगळ्या आजारापासून बचाव होतो. जर रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाली तर आजारीपडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणंगरजेचं आहे.सर्व आजारांपासून वाचण्यासाठी आपण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण पौष्टिक आहार घेतला पाहिजे.
आपण आपल्या आहारात अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन आणि मिनरल युक्त पदार्थांचासामावेश करायला हवा.हळदी मध्ये कर्क्यूमिन यौगिक आणिएंटीऑक्सिडेंट कोशिकाना संक्रमणा पासून वाचण्यासाठी जास्त शक्तीशाली करण्याची ताकतअसते आणि इम्यून सिस्टम साठी ते महत्वाचे आहे.
दिवसाची सुरूवात चवनप्राशने करा. याशिवायहर्बल टी अथवा काढा घ्यावा. यात तुळस, दालचीनी, काळी मिरी, आले पाण्यात टाकून उकळून घ्यावे व ते गाळून पाणी प्यावे. असे तुम्ही दिवसातून 1 ते 2 वेळा करू शकता.
दररोजच्या जेवणात लसणाचा वापर होत असतोपरंतु कच्चा लसूण खाण्यास प्राधान्य दयावे. त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गाजर तसेच रताळं खाल्ल्याने शरिराची रोगप्रतिकारशक्तीवाढते.सुकामेवा व धान्य (डाळी, कडधान्य) यांच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती सुरळीत होते. तसेच रोगप्रतिकारक पेशी अधिक सक्षमतेने संसर्गाचा प्रतिकारकरु शकतात.
महत्वाच्या बातम्या-
उद्यापासून 31 जुलैपर्यंत OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘हे’ चित्रपट
‘मला ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती,मात्र तरीही मी कॉंग्रेस सोडली नाही’
उदयनराजेंनी भाजपच्या छिंदम प्रवृत्तीला पाठीशी घालू नये, कॉंग्रेस नेत्याचे आवाहन
भाजपचे तोंड बंद आंदोलन तर भिडेंकडून अजून सातारा सांगली बंदची हाक नाही, राऊतांचा टोला
‘आमच्या रागारगात शिवछत्रपतींचे रक्त, पुन्हा एकदा दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकवू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

