मुंबई : राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाचं संकट पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुनच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला.
महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.
उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिला. ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी’, अशी सूचनाही केली.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा दिलदारपणा ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ साठी १ कोटी १८ लाखांचा निधी
यावर राज्यात राजकारण पेटलं असताना उदयनराजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “सभापती व्यंकय्या नायडू यांनी जे राज्यघटनेत नाही त्यावर फक्त आक्षेप घेतला. माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं आहे. महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता.” अस उदयनराजे म्हणाले आहेत.
मात्र उदयनराजे यांच्या या स्पष्टीकरणाने कॉंग्रेसचे समाधान झालेले दिसत नाही. यानंतर देखील कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी उदयनराजे यांना आवाहन केले आजे. ‘छ. उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या छिंदम प्रवृत्तीला पाठीशी घालू नये’. अस आवाहन सावंत यांनी केले आहे. तर ‘शिवस्मारकात भ्रष्टाचार करणाऱ्या व मोदींची तुलना शिवारायांशी करणाऱ्या भाजपाचा गड किल्ले विकण्याच्या निर्णयाचीही त्यांनी पाठराखण केली. मोदींसमोर शेवटच्या लाईनमध्ये बसायला त्यांना वाईट वाटत नसेल पण आम्हाला वाटते’. अस सचिन सावंत म्हणाले आहेत.
शिवभक्तांची आक्रमकता पाहून खुद्द उपराष्ट्रपतींचे स्पष्टीकरण, ‘त्या’ वादावर पहिली प्रतिक्रिया
छ. उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या छिंदम प्रवृत्तीला पाठीशी घालू नये.
शिवस्मारकात भ्रष्टाचार करणाऱ्या व मोदींची तुलना शिवारायांशी करणाऱ्या भाजपाचा गड किल्ले विकण्याच्या निर्णयाचीही त्यांनी पाठराखण केली.
मोदींसमोर शेवटच्या लाईनमध्ये बसायला त्यांना वाईट वाटत नसेल पण आम्हाला वाटते.— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 23, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

