मुंबई : राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाचं संकट पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुनच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला.
महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.
‘एकीकडे महाराजांसारखी दाढी वाढवून त्यांची बरोबरी करायची अन् दुसरीकडे त्यांचा नावाला विरोध करायचा’
उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिला. ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी’, अशी सूचनाही केली.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिलेल्या या समजावरून आता महाराष्ट्रात चांगलच राजकारण पेटलं आहे. आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी भाजप आणि व्यंकय्या नायडू कडवट शब्दात टीका आहे. ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा देण्यापासून खुद्द छत्रपतींचे वंशज आणि आमचे श्रद्धास्थान श्रीमंत उदयनराजे भोसले महाराजांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला याचा मी एक शिवप्रेमी म्हणून जाहीर निषेध करतो. दिल्लीच्या तख्ताकडून महाराष्ट्राचा अपमान करण्याचे अनेक प्रसंग इतिहासात घडले आहेत. अस पाटील म्हणाले आहेत.
'जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा देण्यापासून खुद्द छत्रपतींचे वंशज आणि आमचे श्रद्धास्थान श्रीमंत उदयनराजे भोसले महाराजांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला याचा मी एक शिवप्रेमी म्हणून जाहीर निषेध करतो.
दिल्लीच्या तख्ताकडून महाराष्ट्राचा अपमान करण्याचे अनेक प्रसंग इतिहासात घडले आहेत. pic.twitter.com/mVWovP4EPA
— Vinod Patil (@vnpatilofficial) July 22, 2020
तर, ‘शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने याच दिल्लीचे तख्त महाराष्ट्राने आपल्या मुठीत ठेवले होते हा ही इतिहास कोणी विसरू नये. छत्रपती आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या दिल्लीने लक्षात ठेवावे की, आमच्या रागारगात शिवछत्रपतींचे रक्त आहे आणि पुन्हा एकदा आम्ही दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकवू’! असा घणाघात देखील विनोद पाटील यांनी केला आहे.
‘एव्हढी मस्ती ?, महाराजांबद्दलच बेगडी प्रेम आम्हाला माहीत आहे भाजपाच्या बेडकांनो’
परंतु शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने याच दिल्लीचे तख्त महाराष्ट्राने आपल्या मुठीत ठेवले होते हा ही इतिहास कोणी विसरू नये.
छत्रपती आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या दिल्लीने लक्षात ठेवावे की, आमच्या रागारगात शिवछत्रपतींचे रक्त आहे आणि पुन्हा एकदा आम्ही दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकवू!
— Vinod Patil (@vnpatilofficial) July 22, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

