औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणारी नवीन १४०० मिलीमीटर व्यासाची लोखंडी जलवाहिनी जालाननगर उड्डाणपुलाजवळ मंगळवारी (दि.४ ) दुपारी अचानक फुटली. तिच्या दुरूस्तीसाठी चार वाजता पाणी उपसा बंद करून वाहिनी कोरडी झाल्यानंतर वेल्डिंंगचे काम हाती घेण्यात आले. रात्री सात वाजेपर्यंत दुरूस्तीचे काम पूर्ण करून उपसा पूर्ववत करण्यात आला. दरम्यान, यामुळे सिडकोतील काही वसाहतींना मंगळवारी होणारा पाणीपुरवठा होऊ शकला नाही, तो बुधवारी करण्यात आला. मात्र शहरातील जलवाहिनी वारंवार ‘डॅमेज’ होतेच कशी, असा प्रश्न नागरीकांनी उपास्थित केला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणार्या दोन्ही जलवाहिन्यात १४०० मिमी. आणि ७०० मिमी. व्यासाच्या योजना कालबाह्य झाल्या आहेत. अशा स्थितीतही वाहिन्यांना थिगळं लावून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला तारेवरचीकसरत करावी लागत आहे. मात्र वारंवार वाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत असल्याने अधूनमधून पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे सत्र सुरूच आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जालाननगर उड्डाणपुलालगत १४०० मिमी. व्यासाची वाहिनी अचानक फुटली.
मात्र जास्तीची फुटली नसल्यामुळे वाहिनीतून पाणीपुरवठा सुरूच ठेवण्यात आला. दुपारी चार वाजता या वाहिनीतील पाणी उपसा बंद करण्यात आला. वाहिनी पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजेनंतर दुरूस्तीसाठी वेल्डिंगचे काम हाती घेण्यात आले. साधारणतः दिड तासांत हे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर लगेच वाहिनीतून पाणी उपसा सुरू केला जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली. तसेच यामुळे सिडको-हडकोसह शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
- तळीरामांची अजब शक्कल, किराणा मालाच्या गोणीत केला दारुचा साठा
- ‘चंद्रकांत पाटलांनी नाथाभाऊंच्या कामाचे श्रेय घेऊ नये’, रोहिणी खडसेंचा टोला
- निवडणूक बूथनिहाय लसीकरण केंद्र सुरू करा, ‘आप’ची मागणी
- गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटला!, नोटीस बजावण्यासाठी पोलिसांना आ. शिरसाट मिळेनात
- इन्शुरन्स कंपनीच्या नावाखाली कृषी सहायकाला ३३ लाखांचा गंडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

