Share

निवडणूक बूथनिहाय लसीकरण केंद्र सुरू करा, ‘आप’ची मागणी

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाला रोखण्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील लोकांसाठी लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर समन्वयाअभावी लसीकरणाची मोहिम नियोजनबध्द पार पडत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे, लस घेणारे नागरीक संभ्रमात आहेत. मराठवाड्यात निवडणूक बूथनिहाय लसीकरण केंद्र सुरू करा, अशी मागणी आम आदमी पक्षाचे संघटक सुग्रीव मुंडे यांनी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्र सरकारने १८ ते ४५ वयोगटातील लोकांना लस देण्याचे आदेश जारी केले आहे. मात्र, राज्य सरकारने लसीकरणाची तारीख पुढे ढकलली आहे. या संपूर्ण लसीकरण मोहिमेचा आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पडत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

तसेच, जिल्हयामध्ये १८ ते ४५ वर्षावरील नागरीकांसाठीच्या लसीकरण मोहिमेत मराठवाडयातील सर्व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृती आराखडा तयार करुन प्रत्येक जिल्हयातील शहरी तथा ग्रामीण भागामध्ये सुनियोजीत पध्दतीने लसीकरण करावे जेणे करुन लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही.

लसीकरण मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी ताई व आशा वर्कर यांची मदत घ्यावी. तसेच शहरी भागातील लसीकरण मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठा महापौर, नगरअध्यक्ष, मुख्यअधिकारी आणि नगरसेवक यांची मदत घेण्यात यावे, असेही मुंडे यांनी म्हटले आहे. चार दिवसांत वरील मागण्या पूर्ण न झाल्यास मराठवाड्यात आम आदमी पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!