औरंगाबाद : लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असताना बजाजनगर येथील जलवाहिणीच्या कामाचे उद्घाटन करणारे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय सिरसाठ यांच्यासह शिवसेनेच्या २० कार्यकर्त्यांवर वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाला आता आठवडा उलटला तरी पोलिसांना आ. संजय शिरसाट नोटीस बजावण्यासाठी मिळत नाही आहे.
मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध संपूर्ण राज्यात लागू केले असताना. त्यांच्याच पक्षातील आमदार संजय शिरसाट यांनी नियमांना हरताळ फासत. जयभवानी सोसायटीमध्ये जलवाहिणीचे उद्घाटन दि. २५ रोजी करण्यात आले. या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नव्हते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेला आठवडा उलटून देखील पोलिसांकडून तपासाची चक्रे हलली नाही. याबाबत तपासी अधिकारी उपनिरीक्षक सचिन पागोटे यांना विचारणा केली असता, त्यांनी तपास चालू असून त्यांना कोर्टात हजर राहण्याची समज लवकरच देणार आहोत. ते आणखीन हजर नसून ते मुंबईला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या मुळे सामान्य माणसाला तात्काळ समज देणारे पोलीस आमदाराला नोटीस देण्यात असमर्थ दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- लातूरमध्ये छुप्या मार्गाने देशी दारूची विक्री सुरूच
- मराठा आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग केला बंद
- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता : महाजन
- ‘सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही ह्याचं खापर पण केंद्र सरकारवर टाका’
- कोरोनामुळे महिला आयपीएल स्पर्धाही स्थगित; मात्र ‘या’ स्पर्धेत खेळण्याची मिळाली संमती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

