Share

तळीरामांची अजब शक्कल, किराणा मालाच्या गोणीत केला दारुचा साठा

Published On: 

औरंंगाबाद : घराच्या दुस-या मजल्यावरील खोलीत धान्याच्या गोणीत देशी-विदेशी दारुचा साठा केलेल्या दिनकर विश्वनाथ थोरात (वय ४२, रा. सुरेवाडी) याला गुन्हे शाखेने पकडले. त्याच्या घरातून पोलिसांनी ३९ हजार ८४२ रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे.

सुरेवाडीतील दिनकर थोरात याच्या घराच्या दुस-या मजल्यावरील खोलीत धान्याच्या गोणीमध्ये देशी-विदेशी दारुचा साठा असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. माहितीची शाहनिशा करून थोरात याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

गुन्हे शाखेचे जमादार सय्यद मुजीब, पोलीस नाईक गजानन मांटे, मिलींद भंडारे, भावसिंग चव्हाण, राहुल खरात, महिला पोलीस संजिवनी शिंदे यांनी मंगळवारी दुपारी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी दारुसाठा जप्त केला असून, त्याच्याविरुध्द हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!