मुंबई : मुंबईतील भांडूप मधील ड्रीम्स मॉलमधील सनराईझ या रुग्णालयात काल रात्री बाराच्या सुमारास आग लागली. या मॉलमध्ये सनराईझ रुग्णालय चालवले जात होते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते.
सनराईस रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आग अत्यंत भीषण असल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी ११ तास लागले. या आगीत दहा जणांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला आहे. त्यात दोन कोरोना रुग्णांचा समावेश असल्याची माहिती सध्या मिळत आहे.
या सर्व गंभीर प्रकरणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हविकास आघडी सरकारवर अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत. आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर सरकारला जाग येणार, या शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.
‘या आगीबाबत अनेक संभ्रम आहेत. ही आग नेमकी कुठे लागली? कशी लागली? तिचा पीएमसी बँकेशी संबंध काय?’ असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. फडणवीस यांनी थेट पीएमसी बँकेशी या आगीचा संबंध जोडल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘जी घटना घडली, त्यामध्ये सरकार, मुंबई महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष व ढिसाळपणा हा स्पष्टपणे या ठिकाणी दिसतो आहे. या संदर्भात आता काही फार बोलणे योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे.
मला असे वाटते की, या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत अशा घटना घडणार नाही, यासाठी घोषणा नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही ही सरकारच्या वतीने झाली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाचे काय होणार ? सुनावणी पूर्ण, सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला निकाल
- बुमराह सुट्टीवर मात्र संजना गणेशन दिसली टिव्हीवर; नेटकरी विचारतायत प्रश्न
- बंद पडलेल्या मॉलमध्ये कोविडसेंटर सुरू करण्यात कुणाचा फायदा होता? मनसेने डागली सरकारवर तोफ
- ड्रिम मॉलमधील आगप्रकरणी रुग्णालयच्या प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल होणार
- पतीचे विवाहबाह्य संबंध; प्रेयसीवर गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

