मुंबई: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावर (nanar refinery) मोठे विधान केले आहे. गेल्या सहा सात महिन्यापासून रिफायनरीवर चर्चा होत आली आहे. परत परत प्रस्ताव येत असतात. कुठेही प्रदूषण वाढणार नाही, पर्यावरणाला काही हानी होणार नाही याची दक्षता घेऊनच आपण पुढे जाऊ. कुठेही प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊनच तो प्रकल्प आला तर आम्ही त्याला पुढे मान्यता देऊ, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना खोचक सवाल केला आहे.
“प्रदूषण होणार नसेल तर रिफायनरीला मान्यता देऊ इति आदित्य ठाकरे. फडणवीस सरकार असताना तुम्ही रिफायनरी कोणत्याही परिस्थितीत नकोच म्हणत होतात. मग आता ही अर्थपूर्ण सुबुद्धी कशी काय सुचली बुवा?”, असा सवाल अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत केला आहे.
दरम्यान कुठेही चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर स्थानिक लोकांबरोबर चर्चा करून त्यांचे न्याय हक्क कसे अबाधित राहतील, त्यांचं नुकसान होणार नाही आणि त्यांचा विश्वास संपादन करून आम्हाला पुढे जायचं आहे. कुणाच्याही विश्वासाला तडा देऊन आम्हाला पुढे जायचं नाही. नाणारचे दोन्ही बाजूचे शिष्टमंडळ मला भेटणार आहे. त्यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
अभिनेता शरद केळकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी,लवकरच..,
तारखेत काय ठेवलंय? म्हणत वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “आजचा दिवस अत्यंत खास…”
“नाना पटोले आप आगे बढो, चमचे आपके साथ है”, पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांची टीका
“मी चुकलो..” क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्यानंतर विल स्मिथची पोस्ट चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

