मुंबई : लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत मुद्यांवर बोलत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी पुन्हा एकदा आपल्या सातारा जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालयासाठी पाठपुरावा करून याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
यावेळी बोलत असतांना पाटील म्हणाले की,‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या पराक्रमाने पवित्र झालेली सातारा जिल्ह्याची भूमि ही शूरवीरांची आहे, असे स्पष्ट करून आजही इथले तरूण सैन्यदलात उत्स्फूर्तपणे भरती होण्यास उत्सुक आहे.’ तसेच दि.२ जून १९६२ ला स्व.यशवंतराव चव्हाण यांनी सातारा येथे सैनिक स्कूलची स्थापना केली. त्यामाध्यमातून अनेकांना देशसेवेची संधी मिळाली. तर सातारा जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील अनेक युवक सैन्यदलात कर्तव्य बजावत आहेत. याशिवाय इतर केंद्रीय सेवामध्ये असणा-यांची संख्या देखील जिल्ह्यात मोठी आहे. केंद्रीय सेवेदरम्यान बदली होत असल्याने अथवा सेवा निवृत्त झाल्यावर त्यांच्या पाल्याच्या अभ्यासक्रमात व शिक्षणात खंड पडत असतो. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये.’
पुढे ते म्हणाले की, ‘जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणीक दृष्ट्या सोयीचे ठरणारे केंद्रीय विद्यालय सातारा जिल्ह्यात नसल्याने इच्छुक विद्यार्थ्यांना नेमके मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळत नाही. परिणामी अनेकांची इच्छा अपूर्ण राहते. जसे सातारा जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय नाही. तसेच ते शेजारील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा नाही. त्यातच लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला केवळ १० विद्यार्थ्यांचीच शिफारस करण्याची मर्यादा आहे. त्यामुळे इच्छा असूनही गरजू विद्यार्थ्यांना संधी देता येत नाही.’
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील मुलांना उत्तम पद्धतीचे शिक्षण मिळावे, केंद्रीय सेवा बजावत असणार्या कर्मचाऱ्यांच्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. याकरिता केंद्रीय विद्यालय व्हावे याबद्दल पुन्हा एकदा संसदेत आवाज उठवून पाटलांनी पाठपुरावा केला.
महत्वाच्या बातम्या
- तारखेत काय ठेवलंय? म्हणत वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “आजचा दिवस अत्यंत खास…”
- अभिनेता शरद केळकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
- “मी चुकलो..” क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्यानंतर विल स्मिथची पोस्ट चर्चेत
- IPL 2022 : कर्णधार हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ प्रश्नावर मोहम्मद शमी म्हणाला ‘नाही’; वाचा काय होता तो प्रश्न!
- “नाना पटोले आप आगे बढो, चमचे आपके साथ है”, पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

