🕒 1 min read
मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला ८ दिवस पूर्ण झाले आहेत. केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या सत्राला सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत देखील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर अजूनही ठाण मांडून आहेत.
दरम्यान बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार अनेकदा राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधामुळे तर कधी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. देशाची राजधानी दिल्लीत सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे आणि देशभरातून या आंदोलनाला पाठींबा दिला जातोय. अशात अभिनेता अक्षय कुमारने एक जाहिरात शेअर केल्यामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.
अक्षयने त्याच्या सोशल अकाऊंटवर ‘पगार बुक’ची एक जाहिरात शेअर केली. या जाहिरातीत अक्षय मासिक वेतन, अडेंटेन्स आणि अॅडव्हान्स पेमेंट यासारख्या आवश्यक गोष्टींचा डिजिटल व्यवहार कसा करावा हे सांगतोय. ‘अब इंडिया का हर बिजनेसमॅन होगा डिजिटल’, असेही तो यात म्हणताना दिसतोय.
दिल्लीत शेतकरी आंदोलन चिघळले असताना अशा काळात या शेतक-यांबद्दल बोलण्याऐवजी तू जाहिराती कसल्या करतोस, अशा शब्दांत लोकांनी त्याला लक्ष्य केले. ‘शेतकरी आंदोलनावर गप्प का?’ असा थेट प्रश्न एका युजरने त्याला केला. अलीकडे अक्षयने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती, यावरही लोकांनी प्रश्न उपस्थित केलेत. इकडे शेतकरी मरताहेत आणि तुला पगार बुकची पडलीये, असे एका युजरने त्याला सुनावले.
Ab India ka har businessman hoga digital. Introducing PagarBook, India Ka #1 Staff Management App. #PagarBookLogaoBusinessBadhao #AbBusinessHogaSmart #MobilePePagar #MadeInIndia @PagarBook pic.twitter.com/undCjgf9To
— Akshay Kumar (@akshaykumar) December 3, 2020
महत्वाच्या बातम्या
- पुणे पदवीधर निवडणूकीत अभिजित बिचुकलेंनी घेतली ‘एवढी’ मते
- ‘इथून पुढील निवडणुका बॅलेट वर झाल्यास भाजपाला त्यांची खरी पात्रता कळेल’
- आता भाजपची उलटी गिनती सुरू झाल्याचं स्पष्ट झालंय – शशिकांत शिंदे
- पेपरवर लिहून देतो, राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही – हसन मुश्रीफ
- Kid of the Year, भारतीय वंशाची गीतांजली राव TIMEच्या सन्मानाची पहिली मानकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

