Share

“कोणावर छापा पडणार हे त्यांना…”, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज (२६ मार्च) लोकसभेत बोलत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच सीबीआय, ईडी, आयकर या संस्था स्वतंत्र असल्याचा दावा करतात मग कोणावर धाड पडणार हे ४-५ दिवस आधी ट्विटरवर कसं समजतं?, असा सवालही त्यांनी केला आहे.

यावेळी बोलत असतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,‘तुम्ही म्हणता सीबीआय, ईडी, आयकर या स्वतंत्र तपास संस्था आहेत. या तपास संस्था स्वतंत्र आहेत तर मग आम्हाला ट्विटरवरून कोणावर धाड पडणार हे ४-५ दिवस अगोदरच कसं समजतं? एखादा नेता १५ दिवसात तुरुंगात जाणार असं बोलणारे नेते भविष्य सांगणारे आहेत का? त्यांना कोणावर छापा पडणार हे कसं माहिती होतं?’, असे सुळे म्हणाल्या.

दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,‘मी यासंदर्भात तारखेनुसार पुरावे सादर करू शकते. याचे दोनच अर्थ निघतात. एकतर तुम्ही मान्य करा की ईडी, सीबीआय या सर्व तपास संस्था सत्तेत असलेल्या लोकांकडून चालवल्या जातात, नाहीतर खरं बोला.’

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!