मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहुलभाई… मेहुलभाई बोलत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा?अशी खोचक विचारणा करतानाच जेवढी तत्परता आणण्यासाठी दाखवताय तेवढीच तत्परता मेहुलभाई पळून जाताना का दाखवण्यात आली नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे.
मेहुल चोक्सी यांना भारतात आणताय चांगली बातमी आहे. परंतु दोन तीन दिवस मेहुल चोक्सी यांना आणण्याचा जोरदार प्रचारही केंद्रसरकारकडून केला जातोय याबाबत नवाब मलिक यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.मेहुल चोक्सी यांना आणताय ठिक आहे परंतु नीरव मोदी… विजय मल्ल्या… सुशील मोदी यांना कधी आणणार आहात. जनतेचा पैसा बुडवून देशातून पळून जाणाऱ्यांची मोठी तुकडी कार्यरत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
मेहुल चोक्सीला आणण्याचा प्रश्न नाही तर तो पळाला कसा हा खरा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे आणि जनता आता उपस्थित करत आहे. देशातील जनतेचा पैसा बुडवून पळत असताना का तत्परता मोदींनी दाखवली नाही असा प्रश्न आजही जनतेच्या मनात जिवंत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- कौतुकास्पद : जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून डिसले गुरुजी यांची नियुक्ती
- संजय राऊतांच ‘ते’ आमंत्रण आम्ही स्वीकारतो; आशिष शेलारांच्या विधानाने उत्सुकता वाढली
- ऱ्हदयद्रावक! मायलेकीसह पुतणीचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
- अजब ! 5G याचिकेवरील सुनावणीवेळी जुही चावला लागल्या गाणी गायला, कामकाजात आणले व्यत्यय
- ट्वीटर युजरचा ‘बाप’ काढणं महापौरांना पडलं महागात, सोशल मीडियावर होताहेत ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

