औरंगाबाद : शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि सुरेश पाटील यांचे चांगले संबंध होते. याचा फायदा उचलत आता राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नितीन पाटील यांच्या माध्यमातून बँक ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्यात. बँकेचे दिवंगत अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र करीत जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध केली होती. एवढेच नव्हे तर डबघईंला आलेली जिल्हा बँक नफ्यात आणली. तेव्हापासून सुरेश पाटील यांच्याकडे बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यांच्या मृत्यूनंतर सर्वपक्षीय संचालक मंडळांनी अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांचा मुलगा माजी आमदार नितीन पाटील यांच्याकडे सोपवली होती.
जिल्हा बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणुकीसाठी १५ फेब्रुवारीपासून अर्ज स्वीकारणे सुरू आहे. आतापर्यंत ४२ अर्ज दाखल झाले. पहिल्या दिवसापासून समीर सत्तार यांनी अर्ज दाखल करत आहेत. समीर यांनी आतापर्यंत बिगर शेती संस्था मतदारसंघातून तीन अर्ज दाखल केले. यासह माजी आमदार नितीन पाटील यांनीही अब्दुल सत्तार यांच्यासोबत अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होतेय.
दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न भाजप नेते हरिभाऊ बागडे हे करीत आहेत. बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील हेदेखील याच मताचे आहेत. मात्र, बागडे यांनी बोलाविलेल्या बैठकांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे गैरहजर राहिले होते. काळे म्हणतात, ‘जिल्हा बँकेची निवडणूक कधीच बिनविरोध झाली नाही. बिनविरोध निवडीचा फार्स करून सर्व पक्षांचे मोठे नेते एकत्र येऊन सामान्य नेत्यांना पराभूत करतात. आता ही पद्धत मोडीत काढायची आहे,’ असे डॉ. काळे यांनी सांगितले. महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आहे. ही निवडणूक भाजपविरुद्ध लढाईची असल्याने जिल्हा बँकेत त्यांच्याबरोबर युती करून कसे चालेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने अशीच भूमिका घ्यावी, असे आवाहनही डॉ. काळे यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद जिल्हा बँकेत भाजप एकाकी पडणार?
- होऊ दे व्हायरल : माईक चालू ठेवून झोपी गेले मौलवी साहेब;लोकांना ऐकू आला ‘भलताच’आवाज
- ‘आमचं ठरलंय, किंबहूना आम्ही निर्णय घेतलाय’
- खाम नदी स्वच्छतेसाठी हिंदू- मुस्लिम धर्मगुरू एकवटले
- शिवसेनेचे मंत्री शेतकर्यांचा गळा घोटतात, फडणवीसांचा गडाखांवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

