औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि इको-सत्व यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा’ या प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या खाम नदी पुनरुज्जीवन मोहिमेत शनिवारी (दि.२०) हिंदू, मुस्लिम, बुद्ध, ख्रिस्ती आणि सिख समाजाच्या धर्मगुरूंनी सहभाग नोंदवला. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षात प्रदूषणामुळे नदीचे रुपांतर नाल्यात झाले आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका, व्हेरॉक, भारतीय औद्योगिक महासंघ आणि इको सत्व यांच्या संयुक्त विद्यमाने तीन वर्षात खाम नदीचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे.
खाम नदी पुनर्जीवित करण्याचे काम मनपाने हाती घेतले आहे. हे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. त्याला चालना देण्यासाठी मनपा आयुक्तांनी लोकसहभागातून काम व्हावे यासाठी नागरिकांना आवाहन देखील केले होते. त्याला काही प्रमाणात नागरिकांनी देखील प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी (दि.२० ) त्याचाच एक भाग म्हणून सलग तिसऱ्या शनिवारी लोकसहभाग मोहीम हाती घेण्यात आली.
ह्या मोहिमेत हिंदू, मुस्लिम, बुद्ध, ख्रिस्ती आणि सिख समाजाचे धर्मगुरू ह्यांनी नोंदवला. मनपा आयुक्त आणि प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सर्व सहभागी धर्मागुरूचे आभार मानले. यासोबत एमआयटी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी, एनजीओ लाईफ केअर आणि अन्य संस्था आणि नागरिक सहभागी झाले. मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे, उपायुक्त अपर्णा थेटे, यांत्रिकी विभागाचे उपअभियंता देवीदास पंडित, स्वछता निरीक्षक असादुल्ला खान आणि स्मार्ट सिटी चे आदित्य तिवारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- मुंडे भावंडांसाठी जिल्हा बँकेची निवडणूक पुन्हा ठरणार प्रतिष्ठेची
- सरकार प्रकरण दाबतंय, सीबीआय चौकशी करा ; तृप्ती देसाईंची मागणी
- कॉंग्रेस पक्ष आर्थिक संकटात ; नेत्यांना दिले फंड उभारणीचे आदेश
- शिवजंयतीनिमीत्त गोदावरी नदीचे पात्र साफ
- ‘लाख संकटं आली पण ५५ वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पवारसाहेबांना कधीही अंतर दिले नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

