पुणे : ‘आमचं ठरलं आहे. किंबहूना आम्ही निर्णय घेतला आहे. ज्या शहरा ज्या पालिकेत ज्या पक्षाची ताकद अधिक आहे. तिथे त्या पक्षाने नेतृत्व करावं. इतरांनी त्यांच्या नेतृत्वात लढावं. हा आमचा फॉर्म्युला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे.
शिवसेनाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याने या पालिका निवडणुकीत शिवसेना नेतृत्व करेल. आघाडीतील इतर पक्ष शिवसेनेसोबत येतील’, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा स्थानिक पातळीवरील समन्वयाचा नवा अजेंडा उलगडून सांगितला आहे.
‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीमध्ये कोणताही बेबनाव होऊ नये, म्हणून महाविकास आघाडीने नवा फॉर्म्युला ठरवला आहे. ज्या महापालिकेत ज्या पक्षाची ताकद अधिक आहे. त्या पक्षाच्या नेतृत्वात निवडणुका लढायच्या असं महाविकास आघाडीत ठरलं आहे, अशी माहिती राऊत यांनी दिलीय.
संजय राऊत आज पुण्यात आहेत. त्यांनी विविध विषयावर माध्यमांशी संवाद साधला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेत कोण नेतृत्व करणार, यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकेची निवडणूक कशा प्रकारे लढायची याबाबत आम्ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करू. पुणे, पिंपरी-चिंचवडची सत्ता राष्ट्रवादीने ग्यावी. तर मुंबई, ठाण्याची शिवसेना घेईल’, असं म्हणत आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, याची वाच्यता राऊत यांनी केलीये.
महत्वाच्या बातम्या
- ‘लाख संकटं आली पण ५५ वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पवारसाहेबांना कधीही अंतर दिले नाही’
- जेव्हा कलाम राष्ट्रपती झाले तेव्हा अटलजी मोदींना राजधर्म शिकवत होते
- पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्तांनी घेतली लस
- ‘या’ मुलीने आपल्याच मृत्यूची केली होती भविष्यवाणी,जिथे सांगितलं होतं तिथेच मिळाला मृतदेह
- …तर पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील : निर्मला सीतारमण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

