औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. कॉँग्रेस व शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे भाजप वगळून काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र करीत बँक ताब्यात घेण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तारांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्यांनी स्वत: एक तर मुलगा समीर सत्तार यांचे तीन अर्ज दाखल केलेत. त्याचबरोबर काँग्रेसनेदेखील भाजपला वगळण्याचा नारा दिला आहे. यामुळे या निवडणुकीत भाजप एकटे पडणार असल्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणुकीसाठी १५ फेब्रुवारीपासून अर्ज स्वीकारणे सुरू आहे. आतापर्यंत ४२ अर्ज दाखल झाले. पहिल्या दिवसापासून समीर सत्तार यांनी अर्ज दाखल करत आहेत. समीर यांनी आतापर्यंत बिगर शेती संस्था मतदारसंघातून तीन अर्ज दाखल केले. यासह माजी आमदार नितीन पाटील यांनीही अब्दुल सत्तार यांच्यासोबत अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होतेय.
एकीकडे आमदार हरिभाऊ बागडे सर्वांना एकत्र आणत बँकेवर पुन्हा भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली करीत आहे. त्यांच्या विरोधात राज्यमंत्री सत्तार आणि बागडेंचे प्रतिस्पर्धी डॉ.कल्याण काळेही भाजप विरोधात सूर काढत असल्याने भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
बँकेचे दिवंगत अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र करीत जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध केली होती. एवढेच नव्हे तर डबघईंला आलेली जिल्हा बँक नफ्यात आणली. तेव्हापासून सुरेश पाटील यांच्याकडे बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यांच्या मृत्यूनंतर सर्वपक्षीय संचालक मंडळांनी अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांचा मुलगा माजी आमदार नितीन पाटील यांच्याकडे सोपवली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘लाख संकटं आली पण ५५ वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पवारसाहेबांना कधीही अंतर दिले नाही’
- जेव्हा कलाम राष्ट्रपती झाले तेव्हा अटलजी मोदींना राजधर्म शिकवत होते
- पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्तांनी घेतली लस
- ‘या’ मुलीने आपल्याच मृत्यूची केली होती भविष्यवाणी,जिथे सांगितलं होतं तिथेच मिळाला मृतदेह
- …तर पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील : निर्मला सीतारमण


