🕒 1 min read
पुणे- सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड चालेल हे कुणी सांगू शकत नाही. ट्विटरच्या ट्रेंडमध्ये सध्या श्वेता नावाची मुलगी आहे. श्वेता हि तिच्या चावट गॉसिपमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सध्या एका झूम मिटिंग मधील व्हिडीओ क्लीप सध्या तुफान व्हायरल झाली आहे.
यामध्ये श्वेता नावाची एक तरुणी आपल्या सेक्स-अॅडिक्ट मित्राविषयी तिच्या मैत्रीणीला सांगत आहे. झूम क्लास सुरु असताना माईकऐवजी तिने स्पीकर ऑफ केला आणि तिने यानंतर मारलेल्या सर्व चावट गप्पा तब्बल क्लासमधील १११ जणांनी ऐकल्या.
असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला असून एका मशिदीच्या मौलवीने देखील अशीच एक चूक केली आहे. या मौलवीचा व्हिडिओ खूप वेगवान व्हायरल होत आहे. अजान पठण केल्यानंतर मौलवी माईक बंद करायला विसरले आणि त्यानंतर जे लोकांना ऐकायला मिळाले त्यावरून सोशल मिडीयावर धुमाकूळ सुरु आहे.या व्हिडिओमध्ये माइक चालू असून मौलवी रात्री घोरताना सर्वाना ऐकायला येत आहे.
काही यूजर्स लोकांनी आता या व्हिडीओ वरून मौलवींना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.तर काहींच्या मते मौलवीसाहेबांसारख्या भाग्यवान माणसालाच अशी झोप लागू शकते.दरम्यान,ही घटना कुठे घडली आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ 51 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
Molvi sahab mic on kr k sogaye ???????????? pic.twitter.com/kjBypHqGZh
— Arnold Shalwar Nikkar (@Calakand) February 17, 2021
श्वेताच्या नावाने तसेच त्या मौलवींच्या नावाने देखील अनेक मीम्स व्हायरल होत आहेत 14 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कसे मौलवी झोपले आहेत आणि त्यांच्या घोरण्याचा आवाज पुऱ्या मोहल्ल्याला ऐकू जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘लाख संकटं आली पण ५५ वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पवारसाहेबांना कधीही अंतर दिले नाही’
- जेव्हा कलाम राष्ट्रपती झाले तेव्हा अटलजी मोदींना राजधर्म शिकवत होते
- पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्तांनी घेतली लस
- ‘या’ मुलीने आपल्याच मृत्यूची केली होती भविष्यवाणी,जिथे सांगितलं होतं तिथेच मिळाला मृतदेह
- …तर पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील : निर्मला सीतारमण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
