कोल्हापूर : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याने राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अधिकचा ऑक्सिजन पुरवण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे इतर राज्यातून ऑक्सिजनची मदत मिळत आहे. राज्य सरकारने देखील ऑक्सिजन निर्मिती वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, अशातच कानडी सरकारने महाराष्ट्राचा प्राणवायू पुरवठा रोखला आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नेमका काय प्रकार ?
आज कर्नाटक सरकारने अचानकपणे सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा रोखला आहे केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारा 50 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा कर्नाटक सरकारने रोखला आहे. कर्नाटकच्या बेल्लारीमधून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुरु होता. पण कर्नाटक सरकारने तो आज बंद केला आहे. सांगली जिल्ह्यासाठी ऑक्सिजन आणणारा टँकर रिकामा परतला आहे. अचानकपणे ऑक्सिजन पुरवठा थांबल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- संकट गंभीर गडकरी खंबीर; वर्ध्यातील कंपनीत रेमडेसिवीर निर्मितीला सुरुवात
- ‘पश्चिम बंगालमध्ये अराजकता, राष्ट्रपती राजवट लागू करा’, गिरीश महाजनांची मागणी
- सोलापूरकरांचा नाद खुळा! तीन लाखांचा दंड भरू पण, मास्क लावणार नाही
- इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या, आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाकडून नोटीस
- ‘कर्ज फेडण्यासाठी छोट्या कर्जदारांना जास्त वेळ द्या’, आरबीआयचे बँकांना निर्देश


