वर्धा : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात येण्यासाठी तसेच ऑक्सिजन व व्हेंटीलेटर्सचा तुटवडा कमी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख असलेल्या नितीन गडकरींकडेच कोरोना लढाईची सूत्रे सोपवावीत अशी मागणी केली जात आहे.
आता नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्मिती करण्यात येणार आहे. नुकतंच नितीन गडकरी यांनी वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब कंपनीचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, खासदार रामदास तडस उपस्थितीत होते.
या ठिकाणी दरदिवशी 30 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन बनवण्याचे लक्ष्य आहे. विशेष बाब म्हणजे या कंपनीला परवाना मिळण्यासाठी गडकरी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. गडकरींमुळेच हैदराबाद येथील हेट्रा कंपनीकडून सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफसायन्सला उसणवार तत्वावर निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे.
दरम्यान, नितीन गडकरी यांनी याआधीच राज्य सरकारवरील ताण कमी होण्यासाठी विदर्भाची जबाबदारी स्वीकारतो तुम्ही उर्वरित भागांवर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना राज्य सरकारला केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणाबद्दल भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक’, अर्जुन खोतकरांची टीका
- औरंगाबादकरांना दिलासा! आठवडाभरात होम आयसोलेशनची संख्या निम्म्यावर
- लस घ्या अन घरी जातांना कोरोना घेऊन जा! लसीकरणासाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
- पुणे शहर व पश्चिम महाराष्ट्रात भाजपा क्रमांक एकवर राहण्यासाठी मी जीवाचं रान करणार : काकडे
- साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक; भाजपच्या कार्यकर्त्यांवर शिंदेंचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

