Share

रुग्णांना योग्य उपचार मिळालेच नाही तर कोरोना कसा रोखणार? खा. दानवेंचा सवाल

Published On: 

जालना: जिल्हा प्रशासन आणि पालिकेने जाहीर केलेल्या कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांच्या आकडेवारीत मोठी तफावत दिसत आहे, त्यातच कोरोनाचे उपचार, त्यासाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा, रेमडेसिविर इंजेक्शन आणि लसीकरण या सर्व बाबतीत जिल्ह्यात भेदभाव केला जातो आहे. ग्रामिण भागातील कोरोना रुग्णांना योग्य सल्ला आणि उपचार मिळत नाही. सर्व सुविधांचा ओघ हा ठराविक एकाच भागाकडे पाठवला जात आहे. असे असेल तर पूर्ण जिल्ह्यातील कोरोना कसा आटोक्यात येईल? असा प्रश्न करत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पालकमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनावरही ताशेरे ओढले आहेत.

खा. रावसाहेब दानवे बुधवारी जालना शहरात होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या व्यवस्थापनावर टीका केली आहे. जिल्ह्यातील परिस्थिती आणि प्रशासन दाखवत असलेली आकडेवारी यात मोठी तफावत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यांना उपचार तर सोडाच परंतु योग्य सल्ला आणि मार्गदर्शनही मिळत नाही. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. हे मृत्यू प्रशासनाच्या नोंदीवरही येत नाही ही गंभीर बाब असल्याचे दानवे यांनी सांगितले. कोरोनाच्या उपचारासाठी ज्या सुविधा देणे आवश्यक आहे त्या सगळीकडे सारख्या दिल्या जात नाहीत. त्या देताना भेदभाव केला जातो आहे.

राज्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची कमतरता जाणवते तेव्हा केंद्र सरकारकडे बोट दाखवले जाते. मात्र जेव्हा केंद्र सरकार मदत देते तेव्हा ती आम्ही आणली, असा दावा राज्यातील मंत्री करतात. जालन्यात दहा हजार रेमडेसिविर आल्याचा दावा करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात यातील मोठ्या प्रमाणात इंजेक्शन अन्यत्र वळवण्यात आली. आता जिल्ह्यात वापर झालेले रेमडेसिविर कोणत्या पेशंटसाठी किती वापरले आहेत याची माहिती मागवली आहे, असे दानवे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!