🕒 1 min read
मुंबई – सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ बुधवारी रद्दबातल ठरवला. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्याने हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. यानंतर राज्यात सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
यातच आता भाजपनेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी आणि खा. शरद पवार यांच्यावर शरसंधान केले आहे. ट्वीटमध्ये राणे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याकरिता कधी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत पण मराठ्यांना आरक्षण मिळूच नाही याकरिता अनेक वेळा त्यांची भूमिका जाणवली. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीन तेरा वाजवले. अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत असे म्हटले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याकरिता कधी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत पण मराठ्यांना आरक्षण मिळूच नाही याकरिता अनेक वेळा त्यांची भूमिका जाणवली. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीन तेरा वाजवले. अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 5, 2021
आणखी एका ट्वीटमध्ये राणे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे फेल झालं आहे. सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही ह्याचं खापर पण केंद्र सरकारवर टाका. फार मोठ्या प्रमाणावर मराठा तरुणांचा नुकसान झालेलं आहे. त्यांच भवितव्य अंधारात ढकलण्याच काम ठाकरे सरकारने केलंय. या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध! असं राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय अहंकाराचा विषय करू नये’
- मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू करणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे – खेडेकर
- ‘मराठा समाजाने कोणाच्या दबावाला अथवा दिशाभूल करणाऱ्यांच्या वक्तव्यांना बळी पडू नये’
- ‘मराठा समाजाने ज्या संयम आणि धीराने आजवर हा लढा दिला आहे, तोच संयम या पुढेही दाखवावा’
- ‘सर्वोच्च न्यायालयातील अपयशाची जबाबदारी अशोक चव्हाण व राज्य सरकारला घ्यावीच लागेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

