Share

‘बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या संस्था तोट्यात कशा?’ नितेश राणेंचा बीएमसीला सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते नितेश राणे यांनी बृहन्मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहिले आहे. त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या संस्था तोट्यात कशा? असा सवाल नितेश राणेंनी बीएमसीला केला आहे. तसेच यासह अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

बृन्हमुंबई क्रिडा आणि ललित प्रतिष्ठान या संस्था नियमित आणि चांगलं काम करत होत्या, असं म्हटलंय. सर्व संस्था तोट्यात चालत असून खासगीकरणाशिवाय पर्याय नाही हा दावा कोणत्या कॅान्ट्रॅक्टर्सच्या फायद्यासाठी ?, असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.

इतकी वर्ष संस्थेच्या कोट्यवधी रूपयांच्या ठेवींच नेमकं काय झाल ? कुठे खर्च झाल्या याचा हिशोब द्या, अशी मागणीही नितेश राणेंनी केली आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून खाजगी कॅान्ट्रॅक्टर्स भरती करण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत.

बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानाच्या दोन्ही संकुलाची संकल्पना आणि अंधेरी संकुलाचे उद्घाटन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते तीस वर्षापूर्वी करण्यात आले होते. मुंबई महानरपालिकेला देण्यात येणारा मालमत्ता कर , पाण्याचे देयक , बिगरशेती कर तसेच विद्युत जबाबदारीने काम न केल्याने स्वतःच्या मर्जीतले स्वार्थी कर्मचारी यांना सोबत घेऊन प्रशासनाला उपोषणाचा इशारा देऊन अर्जित रजेवर निघून गेले. त्यानंतर गणेश देवकर यांची बदली मुलुंड संकुलातील नाट्यमंदिर सहा. व्यवस्थापक या पदावर करण्यात आली.या पदावर काम करीत असताना त्यांनी पूर्वीच्या व्यवस्थापकाप्रमाणे कधी खंडित वेळेत काम केलेले नाही. तसेच रात्रीच्या सत्रातही इतर कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देऊन स्वतः गैरहजर राहिले. सध्या देवकर दोन्ही क्रीडा संकुलाच्या सहा व्यवस्थापक (जनसंपर्क अधिकारी) या पदाचे काम करीत आहेत.

परंतु सन २०१ ९ साली पूर्वीचे प्रशासकीय अधिकारी विलास तेजम यांनी घरगुती अडचणीमुळे राजीनामा दिल्यामुळे तेव्हा सेवा जेष्ठतेचा विचार न करता गणेश देवकर यांनी तात्पुरत्या स्वरुपात प्रशासकीय अधिकारी या पदाचे काम पाहण्याकरिता आदेश देण्यात आले आहेत. या पदाचे काम पाहत असताना कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे बोलणे, प्रशासकीय बाबींनुसार कामकाज न करणे, कर्मचाऱ्यांना बदलीबाबत दमदाटी करणे,अशा प्रकारे प्रशासनाचा कारभार सध्या चालविला जात आहे. तसेच सहा व्यवस्थापक या मूळ पदाचे ते कोणत्याही प्रकारचे काम करीत नाहीत . प्रशासकीय अधिकारी या पदाचे काम पाहत असताना त्यांची मुलुंड संकुलात उपस्थिती कमी आहे. सध्या दोन्ही क्रीडा संकुलात विविध विभागातील काही सहा व्यवस्थापक सेवानिवृत्त झाल्याने तसेच पुढील कालावधीमध्ये काही सहा व्यवस्थापक सेवानिवृत्त होत असल्याने गणेश देवकर यांची नेमणूक पुन्हा सहा व्यवस्थापक या पदावर करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या प्रतिष्ठानामध्ये काम करीत असणारे अधिकारी व कर्मचारी यांचा बेरोजगारीचा आणि भवितव्याचा जटिल प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे कर्मचारी व अधिकारी यांचे कुटुंबियही चिंतेत आहेत.

त्यामुळे बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानामधील दोन्ही संकुलातिल विविध क्रीडा सुविधांचे खाजगीकरण न करता या सुविधा प्रतिष्ठानामार्फत एक चांगले ध्येयधोरण ठरवून चालविणे तसेच बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानातील दोन्ही क्रीडा संकुलातील आवश्यक त्या विभागांच्या दुरुस्ती व नूतनीकरण करण्याकरिता पूर्वीप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक संकल्पात तरतूद करून त्या बाबत पूर्तता करावी अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!