🕒 1 min read
मुंबई – राज्यात लागू करण्यात आलेल्या नव्या टाळेबंदीला लोक जुमानत नसल्याचं काल अनेक ठिकाणी दिसून आलं. या पार्श्वभुमीवर पोलिस प्रशासनानं ब्रेक द चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच नियम मोडणार्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले आहेत. निर्बंधांच्या अंमलबजावणीचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला. या बैठकीला वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
राज्यभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या सर्वांसाठीच डोकेदुखीचा विषय बनत चालली आहे.कोरोनाला रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. या उपाययोजना करत असताना जनतेला जास्त त्रास होणार नाही याची काळजी शासन घेत आहे. मात्र जनतेकडून म्हणावे तितके सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीची घोषणा केली आहे. मात्र पुण्यातच नव्हे तर राज्यात बहुतांश ठिकाणी लोकांनी नेहमीप्रमाणे गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. किराणा मालाची दुकाने, रस्त्यावर, भाजीपाला खरेदीसाठी,सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. वाघोली,हडपसरसह शहरातील विविध भागात गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
- नागरिकांशी संवेदनशीलपणे वागा; गृहमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना
- कोहली-रोहितच्या पगारामध्ये वाढ नाही मात्र, हार्दिक पांड्याचे प्रमोशन
- भाजपचा आमदार फुटून पोटनिवडणूक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये; जयंत पाटलांच सूचक विधान
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- बारा बलुतेदारांना स्वतंत्र पॅकेज देऊन मदत करा; वडेट्टीवारांच मुख्यमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

