Share

मागील एक-दोन दिवसांत घडलेल्या सर्वच घडामोडी अतिशय विचित्र – दिलीप वळसे-पाटील

Published On: 

पुणे : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

अनिल देशमुख यांच्या घरी ईडीकडून झडाझडती सुरू आहे. या तपासासाठी 6 ते 7 अधिकारी नागपुरातील देशमुखांच्या घरी पोहोचले आहेत. अनिल देशमुख यांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, झाडाझडती होताना अनिल देशमुख घरी नव्हते, तर त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते.

आता अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून करण्यात येत असलेल्या या कारवाईवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘यासंदर्भात मी काही बोलण्याची गरज आहे, असं वाटत नाही. यंत्रणेचा तपास सुरू आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट पण आहे. त्यामुळे या संदर्भात मी जास्त बोलणं उचित ठरणार नाही’. असं गृहमंत्री वळसे पाटील यावेळी प्रतिक्रिया देताना तसेच, मागील एक-दोन दिवसांत घडलेल्या सर्वच घडामोडी अतिशय विचित्र आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!