Share

गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते मोक्षदा पाटील यांचा गौरव

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना राष्ट्रीय महिला आयोगामार्फत ‘कोविड वुमन वॉरीअर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोक्षदा पाटील यांचा सत्कार केला. शहरात महिला बीट अंमलदार परिसंवाद व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सत्कार सोहळा पार पाडला.

यावेळी आ. विक्रम काळे, आ. अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, याबरोबरच पोलीस अधीक्षक कार्यालयाचे वरीष्ठ अधिकारी आणि चाळीस महिला बीट अंमलदार, पोलीस अधीक्षक कार्यालयाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील म्हणाल्या की, औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाने कोविड कालावधीत तत्पर राहुन काम केले आहे. त्याच प्रमाणे गुन्हे तपासणीचे प्रमाण वाढवले असून ‘तुरंत 24’ या विशेष प्रतिसादात्म्क कार्यक्रमास नागरिकांच्या तक्रारींचे 99 टक्के पर्यंत निपटारा केला आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दल लोकाभिमुख काम करीत आहे. याचबरोबर ‘अभिन्न’ या कार्यक्रमांतर्गत शाळा महाविद्यालयामध्ये लिंगभेद होऊ नये यासाठी विविध उपक्रमातून जाणीव जागृती व माहिती दिली जात आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतीमा सुधारण्याबरोबरच सुरक्षा, सन्मान आणि स्वावलंबन यासाठी महिला बीट अंमलदारांचे सहकार्य होईल.

राज्यात औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने नवीन आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. यात महिला पोलीसांवर बीट अंमलदाराची जबाबदारी देऊन महिलांना पोलीस दलात समान संधी उपलब्ध करून दिल्याने बीट अंमलदार हे कर्तव्य अधिक जबाबदारीने पार पाडतील असा विश्वास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी देशमुख यांच्या हस्ते महिला बीट अंमलदारांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!