🕒 1 min read
औरंगाबाद : पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध योजना राबवल्या जात आहेत. स्मार्ट सिटी बस ही त्यातीलच एक योजना. नुकतेच स्मार्ट सिटी बसने शहरात २ वर्षे पुर्ण केले आहेत. स्मार्ट सिटी बस योजनेंतर्गत सध्या शहरात १०० बसेस धावत आहे. नवीन वर्षात शहराला आणखी 200 शहर बस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी केंद्र शासनाने नवीन योजना आखली आहे. परिवाहन नियमानुसार एक लाख संख्यामागे पन्नास शहर बसची गरज आहे. या आकडेवारी नुसार शहराला ५०० शहर बस लागतील. केंद्र शासनाच्या या योजनेतून शहराला मदत मिळणार आसून, यातून शहराला आणखी २०० बसेस उपलब्ध होऊ शकतील, अशी माहिती पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.
नवीन २०० बसेसचा प्रस्ताव औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे. औरंगाबादचा दोनशे बसचा प्रस्ताव केंद्र शासनाने मंजूर करावा, यासाठी खासदार इम्तियाज जलील व डॉ भागवत कराड यांचीही मदत घेतली जाणार आहे. स्मार्ट सिटीमधील शहर बससेवा दहा वर्षे सुरु राहील, यादृष्टीने नियोजन केलेले आहे. केंद्र शासनाकडून २०० बसेस उपलब्ध झाल्या तर वीस वर्षे सेवा बघण्याची गरज राहणार नाही, असे आयुक्त पांडेय यांनी सांगितले
महत्वाच्या बातम्या
- राज्यात पोलीस भरती दोन टप्प्यांत होणार-गृहमंत्री
- ३६ जिल्ह्यांत स्वतंत्र कोर्टांसह पथकांचीही नेमणूक करणार-अनिल देशमुख
- अण्णा नेमके कोणाच्या बाजूने?; शिवसेनेचं अण्णांवर टिकास्त्र
- नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत – नवाब मलिक
- ‘जनमताचा स्पष्ट कौल विश्वासघाताने नाकारण्या एवढे तुम्ही नक्कीच नतद्रष्ट आहात’


