🕒 1 min read
नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलनाने देशाची राजधानी दिल्ली मध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांची दमछाक होत आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रक्टर मोर्चा मध्ये शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. त्यामुळे देशभर नव्हे तर जगभर या हिंसक वळण लागलेल्या आंदोलनाचे पडसाद पडले.
आता पुन्हा दिल्ली हादरली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ५.०५ मिनिटांनी दिल्लीतील अब्दुल कलाम मार्गावरील इस्रायली दूतावासाच्या इमारतीपासून काही मीटर अंतरावर स्फोट झाला. या स्फोटामुळे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या तीन वाहनांच्या काचा फुटल्या. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच मालमत्तेचीही नुकसान झाले नाही.
हा स्फोट अब्दुल कलाम मार्गावर असलेल्या जिंदाल हाऊसबाहेर झाला. हे जिंदाल हाऊस इस्रायल दूतावासापासून काही मीटर अंतरावर आहे. स्फोटानंतर काही वेळातच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली होती. या स्फोटात काळ्या पावडरचा वापर करण्यात आला होता, असे फॉरेन्सिक टीमकडून सांगण्यात आले. ही स्फोटके रस्त्याच्या बाजूला लपवण्यात आली होती. अशी देखील माहिती देण्यात आली आहे.
या स्फोटानंतर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना या घटनेची माहिती देण्यात आली. दिल्लीतील सर्व विमानतळे, महत्त्वाची आस्थापने, सरकारी इमारतींचे संरक्षण करणार्या सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या स्फोटाबद्दल अहवाल मागितला असून दिल्ली पोलीस आयुक्तांनी गृहमंत्रालयाच्या उच्चाधिकार्यांना या घटनेबद्दल माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात पोलीस भरती दोन टप्प्यांत होणार-गृहमंत्री
- ३६ जिल्ह्यांत स्वतंत्र कोर्टांसह पथकांचीही नेमणूक करणार-अनिल देशमुख
- अण्णा नेमके कोणाच्या बाजूने?; शिवसेनेचं अण्णांवर टिकास्त्र
- नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत – नवाब मलिक
- ‘जनमताचा स्पष्ट कौल विश्वासघाताने नाकारण्या एवढे तुम्ही नक्कीच नतद्रष्ट आहात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

