🕒 1 min read
बीड : शिवसेना किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते (रा. बाभळवाडी) यांच्यावर घरात घुसून हल्ला करण्यात आला. यावेळी खिडक्यांसह वाहनाची तोडफोडही करण्यात आली. ही घटना शहरातील स्वराज्यनगरात गुरुवारी रात्री दहा वाजता घडली. याप्रकरणी ३३ जणांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर सातपुते हे स्वराज्यनगरात वास्तव्यास आहेत. गुरुवारी रात्री ते कुटुंबासमवेत घरी होते. यावेळी दादासाहेब खिंडकर, समाधान खिंडकर, बाबूराव खिंडकर, मच्छिंद्र चव्हाण, अविनाश पाटोळे, ज्योतिराम भटे, महादेव मातकर, मोतीराम मातकर, शहादेव मातकर, कुंडलिक भटे, बाबा सातपुते, लक्ष्मण सातपुते, शंकर कदम व इतर २० ते २५ जणांचा जमाव घरासमोर आला.
त्यांनी तलवार, लोखंडी गज, कोयते व लाठ्या-काठ्या व दगडांनी हल्ला केला. भीतीपोटी सातपुते हे कुटुंबासह वरच्या मजल्यावर गेले व दरवाजा आतून बंद केला. यादरम्यान त्याच्या घरात घुसून रोख एक लाख व दोन तोळे सोने लंपास केल्याचे परमेश्वर सातपुते यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी 33 जणांवर दरोडा, जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात पोलीस भरती दोन टप्प्यांत होणार-गृहमंत्री
- ३६ जिल्ह्यांत स्वतंत्र कोर्टांसह पथकांचीही नेमणूक करणार-अनिल देशमुख
- अण्णा नेमके कोणाच्या बाजूने?; शिवसेनेचं अण्णांवर टिकास्त्र
- नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत – नवाब मलिक
- ‘जनमताचा स्पष्ट कौल विश्वासघाताने नाकारण्या एवढे तुम्ही नक्कीच नतद्रष्ट आहात’


