🕒 1 min read
चेन्नई : ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय संपादन करणाऱया टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंसाठी गुड न्यूज आहे. आयपीएलपासून ऑस्ट्रेलियन दौऱयापर्यंत क्वारंटाइनमध्ये राहणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्या कुटुंबीयांसोबत हॉटेलमध्ये राहता येणार आहे. बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या खेळाडूंना यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धीमान साहा व हार्दिक पांडय़ा हे खेळाडू चेन्नईतील हॉटेलमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहतही आहेत.
भारत-इंग्लंड क्रिकेट मालिकेतील लढतींसाठी त्रयस्थ पंचांची निवड करण्यात आलेली नाही. आयसीसीच्या पॅनेलमध्ये असलेल्या भारतातील तीन पंचांची या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. वीरेंदर शर्मा व अनिल चौधरी हे पहिल्यांदाच कसोटीसाठी पंचगिरी करतील. तसेच आयसीसीच्या एलिट पॅनेलचे नितीन मेनन हे देखील या मालिकेत पंच म्हणून काम पाहणार आहेत. कोरोनामुळे पंचांना प्रवास करताना समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयसीसीकडून ही परवानगी देण्यात आलेली आहे.
दरम्यान, भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, ओपनर रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर पहिलेच चेन्नईला रवाना झाले होते. या दरम्यान, टीम इंडियाचा क्रिकेटर रोहितने इन्स्टाग्रामवर पत्नी रितिका सजदेह हिच्यासह चेन्नईतील क्वारंटाइन फोटो शेअर केला होता. रोहितने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक स्टोरी अपलोड केली असून त्यात तो आणि रितिका सोबत दिसत आहेत. “क्वारंटीम” असं कॅप्शन देत रोहितने फोटो अपलोड केला आहे. रोहित पत्नी रितिका आणि मुलगी समायरासह इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे.
महत्वाच्या बातम्या :
- महाविकास आघाडी म्हणजे स्थगिती सरकार ? टीकाकारांना उद्धव ठाकरेंनी दिलं चोख प्रत्युत्तर !
- ‘शक्ती’ कायदा, आरोपीला आता २१ दिवसात शिक्षा मिळणार
- अखेर अण्णांची मनधरणी करण्यात फडणवीसांना यश !
- ३६ जिल्ह्यांत स्वतंत्र कोर्टांसह पथकांचीही नेमणूक करणार-अनिल देशमुख
- अण्णा नेमके कोणाच्या बाजूने?; शिवसेनेचं अण्णांवर टिकास्त्र


