🕒 1 min read
दिल्ली: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Assaduddin Owaisi) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर ३ फेब्रुवारी रोजी मेरठहून दिल्लीला परताना गोळ्या चालवत हल्ला केला गेला. या हल्ल्यात ओविसींना कोणतीही दुखापत झाली नाही. कारच्या दरवाज्यावर ह्या गोळ्या लागल्या. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून त्यांना झेड प्लस (Z) सुरक्षा प्रदान केली गेली मात्र त्यांनी ती नाकारली.
याच पार्श्वभूमीवर आज लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन दिले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात हा एक भ्याड प्रकारचा हल्ला असल्याचे म्हंटले तर ‘मी ओवेसी यांना विनंती करतो की त्यांनी झेड सुरक्षा घ्यावी’ जेणे करून भविष्यात अश्या प्रकारच्या घटना उद्भवणार नाहीत. अमित शहा यांनी या हल्ल्याप्रकरणी असदुद्दीन ओवेसी यांनाच बेजबाबदारप्रमाणे आपला प्रवास केल्याचे म्हंटले. त्यांनी आपल्या या प्रवासाची माहिती पोलिसांना दिली नसल्याची माहिती शहा यांनी लोकसभेत दिली
यावर (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी मात्र या विनंतीस नकार देत एड सुरक्षा नाकारली. झेड सुरक्षा ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सुरक्षा आहे. या हल्ल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या कडून दोन पिस्तुले आणि एक मारुती कार जप्त केली आहेत. असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत बोलताना मला झेड सुरक्षा नको असून मला अ (A) श्रेणीचा नागरिक वह्याचे आहे. माझ्यावर गोळ्या झाडणीयऱ्यांवर (UAPA) कायद्यातर्गत अजून गुन्हा का नोंदवला नाही असे त्यांनी विचारले. जेव्हा देशातील गरीब सुरक्षित असतील तेव्हा मी सुरक्षित असेन असे देखील ते आपल्या भाषणात म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “तीन महिने उठला नाही पाहिजे असा मारण्याचा कट होता”, किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप
- यापुढे सातबारा उतारा बंद करुन केवळ प्रॉपर्टी कार्ड ठेवणार; राज्य शासनाचा निर्णय
- राम कदम यांच्या पत्रावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,‘लतादीदींचे स्मारक बनवणे…’
- धर्म संसदेतील वादग्रस्त वक्तव्यांवर आरएसएस विश्वास ठेवत नाही- मोहन भागवत
- “लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्कात स्मारक बांधा”, राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

