औरंगाबाद : मागील एक महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हाप्रशासनातर्फे ११ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. याआधी रात्री ९ वाजेपासून सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली होती. संध्याकाळी होत असलेली गर्दी पाहता जिल्हाप्रशासनाने १९ मार्चपासून ते एप्रिल पर्यंत रात्री ८ वाजेपासून सकाळी ५ वाजेपर्यंत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
११ मार्चपासून जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन करण्यात आले. यात शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. हॉटेल मध्ये बसताना होत असलेली नियमांची पायमल्ली पाहता जिल्हाप्रशासनाने नुकताच औरंगाबाद शहरातील हॉटेल्सची डायनिंग सुविधा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील रेस्टॉरंट, हॉटेल, परमीट रूम, नाश्ता सेंटर, धाबे, फूड पार्क, फन पार्क, रिसॉर्ट मधील डायनींग सुविधा (आसनावर बसून खाने) १७ मार्च सकाळी ६ पासून ते ४ एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत (15 मार्च) दिली
दिवसेदिवस वाढत असलेला कोरोनाचा विळखा सैल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नवीन नवीन प्रयोग करत कोरोनाला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. यासाठी प्रशासन दिवसरात्र एक करत स्वतः रस्त्यावर उतरले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण मागील काही दिवसापासून स्वतः जिल्हाभर फिरून कारवाई करताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला येऊ नका, अन्यथा..’ काँग्रेसचे शरद पवारांना पत्र
- ‘आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीत राहतो की मोगलांच्या?’
- नवल! तलावातून चार क्विंटल माशांची चोरी
- डीएनए अहवालाच्या पुराव्यामुळे अत्याचारातील आरोपीला २० वर्षांची शिक्षा
- काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासमोर अडचण, कोर्टाने बजावली नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

