Share

‘आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीत राहतो की मोगलांच्या?’

Published On: 

लातूर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथे मंदिर पाडू नका म्हणाऱ्या एका मुलीला केसांना धरुन तिच्याच घरात ओढत नेत अत्याचाराचा प्रयत्न झाला. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा घटना मोगलांच्या काळात घडत होत्या. त्यामुळे हे राज्य कोणाचे आहे? आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीत राहतो की मोगलांच्या? असा सवाल भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमाताई खापरे यांनी केला आहे.

कोपरा येथे मंदिराचे अतिक्रमण काढण्याच्या कारणावरुन एका मुलीला मारहाण करुन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी घटनेची उमाताई खापरे यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी कोपरा गावाला भेट दिली. तसेच पीडित जखमी मुलीची विचारपूस अंबाजोगाईच्या रुग्णालयात जाऊन केली. त्यानंतर लातूर येथे पत्रकार परिषद घेतली.

यावेळी उमाताई खापरे म्हणाल्या की, या घटनेत महिलांचाही समावेश असल्याने असे कृत्य लाजिरवाणे आहे. सरपंचाला काका मंदिर तोडू नका, असे म्हणणाऱ्या मुलीला काही जणांनी गंभीर दुखापत केली. त्यानंतर रक्तबंबाळ झालेली मुलगी किनगाव पोलीस ठाण्यात गेली. पण तिला दवाखान्यात नेण्याऐवजी अहमदपूर पोलीस ठाण्याकडे जाण्याचा सल्ला दिला. तेथून ती मुलगी तशीच अहमदपूर ठाण्यात गेली. तेथेही कोणी दवाखान्यात नेले नाही. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. त्यामुळे आपण शिवरायांच्या भूमीत राहतो की, मोगलांच्या असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!