बीड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन गर्भधारणेस कारणीभूत झालेल्या व नंतर बाळाचे पालकत्व नाकारणाऱ्या आरोपीला बीडच्या अतिरिक्त सह जिल्हा विशेष न्यायालयाचे न्या.एम.व्ही.मोराळे यांनी २० वर्षांची शिक्षा ठोठावली. शहरात दीड वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील मंजुषा दराडे यांनी काम पाहिले.
शहरातील पेठ बीड ठाणे हद्दीत १२ डिसेंबर २०२० रोजी १६ वर्षांखालील अल्पवयीन मुलगी सायंकाळी साडेसात वाजता शौचासाठी घराबाहेर गेली होती. काटेरी झुडूपात नात्यातीलच लव उर्फ राहुल भगवान चांदणे (१९,रा.रामगव्हण ता.अंबड जि. जालना, हमु.भेंडा ता.नेवासा जि.अहमदनगर) याने तिचा पाठलाग करुन बळजबरीने तिच्याशी कुकर्म केले. दरम्यान, लव चांदणे याच्यापासून पीडितेला दिवस गेले. गर्भधारणा झाल्यावर कुटुंबीयांनी विचारपूस केल्यानंतर पाच महिन्यांनी पीडितेच्या फिर्यादीवरुन पेठ बीड ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, अत्याचार या कलमान्वये गुन्हा नोंद झाला.
साक्षीपुरावे ग्राह्य धरुन न्या. एम.व्ही. मोराळे यांनी आरोपी लव चांदणे यास दोषी ठरवून कलम ४ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अन्वये २० वर्षांचा सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा व कलम ५०६ अन्वये सहा महिन्यांची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्याचा कारावास अशी शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस नाईक सी.एस. नागरगोजे यांनी सहाय्य केले.
डीएनए अहवाल ठरला महत्त्वाचा
आरोपीच्या अत्याचारानंतर पीडितेने बाळाला जन्म दिलाय ते बाळ शासकीय शिशुगृहात पाठविण्यात आले. मात्र, आरोपी लव चांदणे याने पालकत्व नाकारले. बाळाचे पालकत्व सिध्द करण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली. यात हे बाळ लव चांदणे याच्यापासूनच झाल्याचे स्पष्ट झाले. आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी हा अहवाल महत्त्वाचा ठरला. विशेष म्हणजे अटकेपासून आरोपी कारागृहातच होता. त्याला अखेरपर्यंत जामीन मिळाला नाही. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालले, अशी माहिती सरकारी वकील मंजुषा दराडे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- फाइलबाबत विचारल्याने महिला लिपिकाने वाहनधारकाला सॅन्डलने झोडपले
- ‘सर्वच नव्हे, ‘या’ सरकारी बँकांचेच होणार खासगीकरण’, सीतारमण यांची महत्त्वाची माहिती
- ‘स्व.गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडाला सक्षम केले हा पंकजांचा गैरसमज’, नामदेव शास्त्री महाराजांची टीका
- वेदनेने विव्हळत अखेर ‘त्याने’ घाटीच्या पायरीवर सोडला प्राण
- पेट्रोलिंग करताना पोलिसांच्या गाडीचा अपघात, ७ जण जखमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
