बीड : मासेमारीसाठी कराराने घेतलेल्या तलावातील चार क्विंटल माशांची चोरी झाल्याची घटना सोमवारी अंबाजोगाई तालुक्यातील धसवाडी येथे घडली. या प्रकरणी तिघांविरोधात बर्दापूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, सिद्दीक वाहेदखान पठाण (रा.धर्मापुरी,ता.परळी) यांनी धसवाडी शिवारातील सिंचन तलाव चालू वर्षासाठी मासेमारीसाठी करार पद्धतीने घेतलेला आहे.
या ठिकाणी त्यांनी मासे सोडले होते. या तलावातील अंदाजे ४० हजार रुपये किमंतीचे तीन ते चार क्विंटल मासे तिघांनी चोरून नेले. याप्रकरणी पठाण यांच्या फिर्यादीवरुन मुनीर वाहेदखान पठाण, खदीर मुनीर पठाण व जमीर मुनीर पठाण (तिघे रा.धर्मापूरी) यांच्यावर बर्दापूर ठाण्यात सोमवारी गुन्हा नोंद झाला.
दाम्पत्यास मारहाण
अंबाजोगाई शहरातील प्रशांतनगर येथे भररस्त्यावर एका दाम्पत्यास मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.१५) घडली. यावरुन दोघांविरुध्द शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. विठ्ठल तुकाराम गडदे (रा.चिचखंडी ता.अंबाजोगाई) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी दुपारी १ वाजता ते प्रशांतनगरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोरुन बसस्थानकाकडे येत होते. यावेळी आबासाहेब हरिभाऊ गडदे, व्यंकटेश आबासाहेब गडदे (दोघे रा.चिचखंडी) यांनी त्यांना वाटेत अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला.
महत्त्वाच्या बातम्या
- डीएनए अहवालाच्या पुराव्यामुळे अत्याचारातील आरोपीला २० वर्षांची शिक्षा
- फाइलबाबत विचारल्याने महिला लिपिकाने वाहनधारकाला सॅन्डलने झोडपले
- ‘सर्वच नव्हे, ‘या’ सरकारी बँकांचेच होणार खासगीकरण’, सीतारमण यांची महत्त्वाची माहिती
- ‘स्व.गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडाला सक्षम केले हा पंकजांचा गैरसमज’, नामदेव शास्त्री महाराजांची टीका
- पेट्रोलिंग करताना पोलिसांच्या गाडीचा अपघात, ७ जण जखमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
