Share

होली है…! निक सोबत प्रियंकाने अशी साजरी केली होळी, पाहा फोटो

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाचे सावट असले तरी होळीचा उत्साह जराही कमी झालेला नाही. मग बॉलिवूड कसे मागे राहिल? बॉलिवूड सेलिब्रिटीही होळीच्या मस्तीत धूंद आहेत. बॉलिवूडपासून हॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राने दणक्यात होळी साजरी केली. पती निक जोनास आणि सासरच्यांसोबत प्रियंकाने धम्माळ रंग उधळले. प्रियंका चोप्रा सध्या विदेशात आहे. पण कोणताही भारतीय सण साजरा करणे ते विसरत नाही.

https://www.instagram.com/p/CM-XYmCjVBn/?utm_source=ig_web_copy_link

आता प्रियंकाने होळीचे फोटो शेअर केले आहेत. यात ती होळी खेळताना दिसत आहेत. खास म्हणजे, पती निकसोबत तिच्या सासरची मंडळीही होळी खेळत आहेत. हे फोटो शेअर करताना प्रियंकाने आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळीचा सण माझ्या आवडत्या सणांपैेकी एक आहे. तुम्ही सगळे आपल्या जवळच्या लोकांसोबत हा सण साजरा कराल, अशी आशा आहे.पण आपआपल्या घरात़ हॅपी होली, असे तिने लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!