मुंबई : शेतमाल घरी आल्यानंतर विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याला शेतमाल विक्री करावा लागतो. अल्प भूधारक शेतकरी तर शेतमाल तयार झाला की बाजार समितीत विक्रीसाठी आणतो. मध्यम व श्रीमंत वर्गातील काही शेतकरी भाववाढ होईल या अपेक्षेने पाच ते सहा महिने सोयाबीनची विक्री थांबवू शकतात. ऐन हंगामात सोयाबीनला ३००० ते ४००० या दरम्यान प्रती क्विंटल दर असतात.
दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्याच्या अल्पदरात सोयाबीनची विक्री करण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. सोयाबीनचा हंगाम संपल्यानंतर 7 ते 8 महिन्याने बाजारभाव वाढतात. याचा अनुभव जुलै महिन्यात शेतकऱ्यांना आला होता. शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर पश्चिम विदर्भातील सोयाबीनची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगले दर मिळाले होते.
शासकीय आधारभूत किंमत 3 हजार 880 रुपये असताना प्रत्यक्षात मात्र दर नऊ हजार पार गेले होते. मात्र आता ऐन हंगामात शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजार समितीत दाखल होताच सोयाबीनला केवळ चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल भाव आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजीचा सूर दिसून येत आहे.
व्यापाऱ्यांनीच ऐन हंगामात सोयाबीनचे भाव पाडले आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. १० हजार रुपये भाव सोयाबीनला मिळावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तसेच केंद्र सरकारने खाद्यतेलाचे आयात शुल्क २५ टक्केपर्यंत कमी केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी येत आहे. सोयाबीनचे भाव घसरल्यानंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तर ट्विटरवर यासाठी सोयाबीन हे हॅशटॅग वापरण्यात येत असून ते सध्या ट्रेंडिंगला असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुश्रीफांच्या बचावासाठी सतेज पाटलांनी ठोकला शड्डू; म्हणाले, ‘बदनामीचा कट हाणून पाडू’
- कमालच ! सिंधुदुर्ग विमानतळ सुरु होण्याआधीच ‘या’ तारखेपर्यंतच तिकीट फुल्ल
- ‘परवा एका एकराला 18 कोटी दिले; आता लोकं भेटून सांगतात, दादा रस्ता तेवढा आमच्या शेतातून न्या’
- ‘…मग हे कसले घंट्याचे बेस्ट CM ?’ निलेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर विखारी टीका
- ओशो आश्रमातील गैरकारभाराची सरकारने चौकशी करावी; ओशो अनुयायांची आठवलेंकडे मागणी


