🕒 1 min read
मुंबई: सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स झालेल्या या सामन्यात लखनऊने १२ धावांनी विजय मिळवला. सामन्यापूर्वी केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून लखनऊला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर सुपर जायंट्सने सनरायझर्सला १७० धावांचे लक्ष्य दिले होते. ज्याचा पाठलाग करताना ते १५७ वरच गारद झाले.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (SRH vs LSG) सामन्यानंतर लखनऊच्या दोन फलंदाजांनी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप-५ मध्ये प्रवेश केला आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संघाचा दीपक हुडा (deepak hooda) आणि कर्णधार केएल राहुल (KL Rahul) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. या सामन्यात दोन्ही फलंदाजांमध्ये ८७ धावांची भागीदारी झाली. दरम्यान, दोन्ही खेळाडूंनी आपापली अर्धशतके पूर्ण केली होती. यामुळे राहुल पुन्हा त्याच्या आवडत्या ऑरेंज कॅप जवळ आला आहे.
तर लखनऊच्या आवेश खानने (avesh khan) या सामन्यात जादुई गोलंदाजी करताना ४ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२२ मध्ये लखनऊच्या विजयाचा आवेश हा सर्वात मोठा हिरो ठरला आहे, कारण त्याने हैदराबादच्या सलामीवीरांना स्वस्तात बाद केले तसेच सामन्याच्या अत्यंत नाजूक क्षणी सामना जिंकणारा स्पेल टाकला, जिथे त्याने निकोलस पूरनला बाद केले. आवेश आता IPL 2022 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. असे करून त्याने राहुल चहर, युझवेंद्र चहल आणि मोहम्मद शमी यांना मागे टाकले आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- महागाई आणि बेरोजगारीचे काय? नाना पटोलेंचा केंद्राला सवाल
- IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सनं चाहत्यांना दिली ‘गूड न्यूज’; पाहा PHOTO!
- “समृद्धी महामार्ग ही माझीच संकल्पना, काहीही केलं तरी…”, देवेंद्र फडणवीसांचा इशारा
- IPL 2022 LSG vs SRH : केन विल्यमसनच्या विकेटमागं ‘असा’ होता मास्टरप्लॅन..! ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरलेल्या आवेश खानचा खुलासा!
- “त्यांची खाज कधी संपेल माहीत नाही”, राऊतांचा राज्यपालांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
