मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या लाइफस्टाइलमुळे सतत चर्चेत असते. बुर्ज अल अरबमध्ये लाइव्ह परफॉर्म करणारी ती पहिली भारतीय कलाकार ठरल्याची माहिती उर्वशीने नुकत्याच एका पोस्टद्वारे दिली. यावेळी तिने निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता.
या लाइव्ह परफॉर्मन्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र मंचावर अत्यंत आत्मविश्वासाने परफॉर्म करताना उर्वशी ‘oops’ मूमेंटची शिकार झाली. वेळीच सावरून उर्वशीने तो परफॉर्मन्स पूर्ण केला आणि प्रेक्षकांना त्याची जाणीव होऊ दिली नाही.
उर्वशीने बॉलिवूडमध्ये फारसे चित्रपट केले नाहीत. मात्र सौंदर्यामुळे आणि बोल्ड अंदाजामुळे ती नेहमीच प्रकाशझोतात असते. तिला ‘इंडियाज प्राइड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याच वेळी उर्वशीने 50 हजार प्रेक्षकांसमोर परफॉर्म केलं. या परफॉर्मन्सदरम्यान उर्वशीने एक गाणंसुद्धा गायलं असून त्याला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळाली. सेव्हन स्टार हॉटेल बुर्ज अल अरबच्या टॉप फ्लोअरवर उर्वशीने परफॉर्म केलं.
महत्वाच्या बातम्या :
IPL 2022 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आता लखनऊचे शिलेदारही धावणार; मुंबईच्या पोराला देणार आव्हान!
“ये लो कॅलरी जेवण…” रितेश देशमुखचा ‘हा’ मजेदार व्हिडिओ पाहिलात का?
“…दंगल वगैरे सगळ्या राष्ट्रवादीला हव्या असलेल्या गोष्टी”; मनसेचे टीकास्त्र
गिलख्रिस्ट आणि रोहितचा डेक्कन चार्जर्स संघ आठवतोय का? आता हा संघ का खेळत नाही?
महागाई आणि बेरोजगारीचे काय? नाना पटोलेंचा केंद्राला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

