हिंगोली: जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या घटना घडत आहेत. गंगाखेड ते परभणी मार्गावरील वडगाव निळा येथे राज्य राखीव दलाचे जवान प्रवास करत असलेल्या स्पेशल रेल्वेवर गंगाखेड–परभणी रेल्वेमार्गावर वडगाव निळा स्टेशनजवळ आठ ते दहा जणांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडली. या प्रकारानंतर जवानांनी गाडी थांबवून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सर्वजण पळून गेले. जवानांनी एका दुचाकीचा क्रमांक गंगाखेडच्या पोलिस ठाण्याला कळवला आहे.
हिंगोली राज्य राखीव दलातील ए व ई कंपनीमधील सुमारे २२० अधिकारी व जवान २४ मार्च रोजी केरळ राज्यात निवडणूक बंदोबस्तासाठी गेले होते. महाराष्ट्रातील २२ कंपन्यांना सोडण्यासाठी कोची येथून १० एप्रिल रोजी विशेष रेल्वे सोडण्यात आली होती. राज्यातील पुणे व इतर भागातील कंपन्या सोडून ही रेल्वे आज हिंगोलीकडे निघाली होती.
ही रेल्वे गंगाखेड-परभणी रेल्वेमार्गावर असलेल्या वडगाव निला रेल्वेस्टेशनवर सकाळी ९ वाजता थांबली. पाच मिनिटानंतर ही रेल्वे पुढील मार्गाला निघाली असताना वडगाव निळा रेल्वेस्टेशनपासून काही अंतरावर ८ ते १० जणांनी रेल्वेवर दगडफेक केली. यामध्ये रेल्वेमधील जवान महादेव अशोक बांगर व स्वप्निल राजेंद्र सुर्वे हे जखमी झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जवानांनी चेन ओढून रेल्वे थांबवून त्यांचा पाठलाग गेला. मात्र ते पळून गेले
महत्वाच्या बातम्या
- नंदुरबारमध्ये बिकट परिस्थिती, बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण गुजरातच्या वाटेवर
- कोणी बेड देता का बेड! उस्मानाबादेत कोरोना रुग्ण बेहाल, जमिनीवरच उपचाराची नामुष्की
- पहिल्याच सामन्यात युनिवर्सल बॉस गेलचा विक्रम; आयपीएलमधील पहिलाच खेळाडू
- देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती
- रेमेडेसिवीर ‘व्हेंटिलेटर’ वर! इंजेक्शनचा साठा उपलब्ध राहील, असे नियोजन करा: पालकमंत्री टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

