Share

हिंगोलीत नगरपालिकेच्या अॅपवर जीवनावश्यक साहित्य मागवल्यास थेट घरपोच सेवा

Published On: 

हिंगोली : नगरपालिकेने कोरोनाच्या लढ्यात एक महत्वाचा उपक्रम राबण्यात आला आहे. नगरपालिकेद्वारे अॅप विकसित केले आहे. या अॅपवर ऑनलाईन साहित्याची नोंद केल्यास ते साहित्य घरपोच उपलबद्ध करुण देण्यात येणार आहे.

हिंगोली नगरपालिकडून नागरिकांना संकटाच्या या काळात जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुण देण्याचा प्रयत्न होत आहे. भाजी खरेदीसाठी गर्दी होऊ नाही. म्हणून शहरात तसेच शहरालगत पाच ठिकाणी भाजी मार्केट सुरु करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा आता पर्यंत फक्त एकच रुग्ण असून आता त्या रुग्णाची प्रकृती ठणठणीत आहे. त्यामुळे आता शहरात कोरोना बाधित वाढू नये यासाठी यंत्रणा जागरूक झाली आहे. व कोरोनाला टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्यास सुरवात केली आहे.

हिंगोली नगर परिषद असे नाव असलेल्या या अॅपमध्ये भाजी विक्रेते, फळ विक्रेते, किराणा दुकानदार, दूध विक्रेते औषध विक्रेते यासर्वांचा समावेश करण्यात आला आहे. नागरिकांना आवश्यक त्या सामानाची मागणी करून ग्राहकाच्या जवळ उपलब्ध असलेल्या विक्रेत्याकडून मागणी केल्यास ते सामान घरपोच पोहचवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हे कार्य करीत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!