Share

उत्तर प्रदेशात हिंदुत्त्वाचा गळा दाबला- संजय राऊत

Published On: 

मुंबई: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी याला अटक केली आहे. दरम्यान यावरच शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नरेंद्र गिरी हे मोठे महंत होते. हिंदुत्वाच्या लढाईत ते सतत पुढे असत. हिंदुत्वावादी संघटना म्हणून शिवसेनेला त्यांनी अनेकदा आशिर्वाद दिले आहेत. पण त्यांचं समोर आलेलं मृत्यू प्रकरण रहस्यमय आहे. आत्महत्या जरी म्हणत असाल तरी त्यांच्या भक्तांना ती हत्या वाटते आणि त्यामुळे याचा तपास होणं गरजेचं आहे. पालघरमध्ये काही साधूंचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला तेव्हा तो हिंदुत्वावर हल्ला असा आवाज भाजपाने तेव्हा देशभरातून उठवला होता. पण नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूंच प्रकरण समोर आलंय त्यातून कुणीतरी उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा दाबलेला दिसत आहे. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच याची सीबीआयकडून चौकशी व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

अ. भा. आखाडा परिषद ही देशातील सर्व संतांची सर्वात मोठी संघटना आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून महंत नरेंद्र गिरी यांनी मृत्यूपूर्वी व्हिडीदेखील रेकॉर्ड केला होता.दरम्यान, महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या हा वाद सुरु असताना आखाडा परिषदेतील संपत्तीचा वाद समोर आल्याने देखील या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!