Share

पुन्हा लागली हिंदू धर्माची ओढ; ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून स्विकारला हिंदू धर्म..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबादः जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील दहा कुटुंबातील ५३ व्यक्तींनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून पुन्हा एकदा हिंदू धर्म स्वीकारला आहे. हा धर्मांतर सोहळा पैठण येथील शांती ब्रम्ह संत श्री एकनाथ महाराजांच्या धर्म मंदिरात झाला. पैठण येथील नाथ महाराजांच्या वंशजांतर्फे रविवारी या लोकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध प्रकारचे हिंदू धर्मविधी करण्यात आले. त्यानंतरच त्यांना हिंदू धर्मात त्यांना जाहीररित्या स्वीकृती देण्यात आली, अशी माहिती पैठण येथील ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी दिली.

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील दहा कुटुंबातील महिला, पुरुष व बालक अशा ५३ जणांनी काही दिवसांपूर्वी हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मात्र काही दिवसातच त्यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्म स्वीकारला. यावेळी नाथांचे १४ वे वंशज रावसाहेब महाराज गोसावी, कीर्तनकार प्रफुल्लबुवा तळेगावकर महाराज, नाथवंशज तथा नाथ पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी, कमलाकर गुरू महाराज पालखीवाले, शालिवाहन नागरी बँकेचे अध्यक्ष किशोर चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती.

धर्मांतर केलेल्यांचा यावेळी शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे चौहान यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी नाथ महाराजांचे वंशज रावसाहेब गोसावी यांच्या हस्ते छोटेखानी समारंभात त्यांचा सत्कार समारंभ पार पडला. दरम्यान ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर या लोकांना मूळ हिंदू धर्माची ओढ लागल्याने त्यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अशाच प्रकारे ५ जानेवारी रोजीदेखील आणखी ६५ महिला व पुरुष पैठण येथील कार्यक्रमात हिंदू धर्मात येतील, असी माहिती ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!