🕒 1 min read
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली कॉंग्रेसला धूळ चारत सत्तेमध्ये आले व तेव्हा पासून ते आजपर्यंत कॉंग्रेसला निरनिराळ्या संकटाना सामोरे जावे लागत आहे. देशात सत्ताबदल झाल्यापासून काँग्रेसला आर्थिक संकटाचा सामना सुरू करावा लागत आहे. त्यामुळे काँग्रेसने फंड उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
त्यासाठीच काँग्रेसची एक बैठक पार पडली. त्यात काँग्रेसच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यात आली असून फंड निर्माण करण्यावरही भर देण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्र, झारखंड आणि पंजाबमधील काही नेत्यांशी चर्चा केली होती. या बैठकीत राज्य सरकारमधील मंत्री आणि संघटनेचे काही सदस्य सहभागी झाले होते.
देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पक्षाची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट झाल्याने काँग्रेसची एक बैठकही पार पडली. त्यात निधी उभारण्यावर चर्चा करण्यात आली. तसेच फंड उभारण्यासाठी नेत्यांनी जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहनही करण्यात आलं.
या बैठकीत काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांच्या नियुक्त्यांबाबत चर्चा झाल्याचं सुरुवातीला सांगितलं जात होतं. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत पक्षाच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सर्व नेत्यांना पक्षाच्या आर्थिक स्थितीची माहिती देण्यात आली. तसेच सर्व सदस्यांना फंड उभारण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलं.
काँग्रेसच्या एका नेत्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या बैठकीत आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यात आल्याचं या नेत्याने सांगितलं. तसेच दिल्लीत तयार होत असलेल्या पक्षाच्या मुख्यालयावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून मुख्यालयाचं काम सुरूच असून अद्यापही ते पूर्ण न झाल्याने काँग्रेस नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पर्यावरणप्रेमींनी अशी साजरी केली शिवजंयती; पुढाकार घेत केले नदिपात्र साफ
- जेव्हा कलाम राष्ट्रपती झाले तेव्हा अटलजी मोदींना राजधर्म शिकवत होते
- पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्तांनी घेतली लस
- ‘या’ मुलीने आपल्याच मृत्यूची केली होती भविष्यवाणी,जिथे सांगितलं होतं तिथेच मिळाला मृतदेह
- …तर पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील : निर्मला सीतारमण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
