Share

शिवजंयतीनिमीत्त गोदावरी नदीचे पात्र साफ

Published On: 

नांदेड : शुक्रवारी शिवजंयती सगळीकडे जल्लोषात साजरी झाली. या दिवशी सर्व शिवभक्तांनी वेगवेगळ्या प्रकारे जंयती साजरी केली. यात प्रामुख्याने वाहनाला भगवा झेंडा लावून शिवरायांचा जल्लोष करत रॅली काढणे. शहरातील छत्रपती शिवरायांच्या उत्सवमुर्तीला अभिवादन करणे. यासारखे अनेक प्रकारे शिवजंयती अविस्मरणीय करण्याचा शिवप्रेमीनी प्रयत्न केला. मात्र याला अपवाद ठरले ते नांदेड शहरातील काही पर्यावरणप्रेमी.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त नांदेडमधील काही पर्यावरणप्रेमीनी शहराचे वैभव असलेल्या गोदावरी नदीला प्रदुषणातून मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरालगत असलेली गोदावरी नदीचे पात्र टप्प्याटप्प्याने स्वच्छ करण्याच्या कामास शिवजंयतीच्या शुभमुहूर्तावर सुरुवात केली. येत्या रविवारी गोवर्धनघाट येथून कामाला सुरुवात होणार आहे. अशी माहिती मिळाली आहे. शुक्रवारी प्रारंभिक स्तरावर नदिपात्राची साफसफाई सुरु करण्यात आली होती.

नदीला प्रदुषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी समाज, शासन व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन पुर्ण क्षमतेने काम करणे गरजेचे आहे. तरच या कामाचा व्यापक परिणाम दिसेल आणि गोदावरी नदी प्रदुषण मुक्त होईल असे या पर्यावरणप्रेमीनी सांगितले. आज शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून कामास सुरवात करण्याचं धाडस आम्ही केलं आहे, असे यावेळी पर्यावरणप्रेमीनी सांगितले. यावेळी परमेश्वर पौळ, संतोष मुगटकर, प्रल्हाद घोरबांड, कैलास अमिलकंठवार, गणेश साखरे नदीपात्र साफ करण्यासाठी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!