बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकेवर झेंडा फडकावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला परळी, केज, आष्टी व बीड या चार विधानसभा मतदारसंघातून सोसायटी मतदारसंघातून नऊ जागा मिळू शकतात. कारण या चारही मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.
राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेत आहेत. राज्यातील समीकरणामुळे क्षीरसागर हे माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या पॅनलला मदत करतील का हे आताच सांगणे अशक्य आहे. एकंदरीत जिल्हा बँकेची निवडणूक माजी मंत्री पंकजा मुंडे व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी अस्तित्वासाठी व प्रतिष्ठेची ठरत आहे. जिल्ह्यातील १९ मतदारसंघातून १३७३ मतदार मतदारांचा हक्क बजावणार आहेत.
सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून यंदा माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, जयदत्त धस, फुलचंद मुंडे, वसंत सानप, महेंद्र गर्जे विद्यमान संचालक भाऊसाहेब नाटकर यांनी, तर इतर संस्था वैयक्तिक मतदारसंघातून नवनाथ शिराळे व रामदास खांडे यांनी अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली. २२ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘लाख संकटं आली पण ५५ वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पवारसाहेबांना कधीही अंतर दिले नाही’
- जेव्हा कलाम राष्ट्रपती झाले तेव्हा अटलजी मोदींना राजधर्म शिकवत होते
- पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्तांनी घेतली लस
- ‘या’ मुलीने आपल्याच मृत्यूची केली होती भविष्यवाणी,जिथे सांगितलं होतं तिथेच मिळाला मृतदेह
- …तर पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील : निर्मला सीतारमण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
