Share

सरकार प्रकरण दाबतंय, सीबीआय चौकशी करा ; तृप्ती देसाईंची मागणी

Published On: 

परळी : राज्यात सद्या पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आहे. वनमंत्री संजय राठोड यांचे या प्रकरणाशी संबध असल्याचे आरोप होत असल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या संबंधित कथित ऑडिओ क्लिप्स देखील व्हायरल झाल्याने हे प्रकरण अधिकच गूढ होत चाललं आहे. तर, पूजाला न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.

ही घटना घडल्याच्या दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड हे गायब आहेत. त्यांचा फोनही लागत नाही. या आरोपांवर त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा खुलासा न केल्याने संशय अधिक बळावत असल्याचा आरोप भाजप कडून केला जात आहे.या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापलेले आहे. संजय राठोड यांनी मात्र अद्यापही या विषयावर मौन बाळगलं असून त्यांचं नाव समोर आल्यापासून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अद्याप कोणताच खुलासा पोलिस प्रशासनाने केला नाही. यामुळे पूजा चव्हानच्या नातेवाईक शांताताई राठोड यांनी पोलीस तपासावर संशय व्यक्त केलाय.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या तृत्पी देसाई यांनी परळीतील वसंत नगर तांडा येथे पूजा चव्हाण यांच्या नातेवाईकांच्या भेट घेतली आहे. ‘सत्ताधारी पक्ष आपल्या मंत्र्यांना आणि सत्ता वाचविण्यासाठी हे प्रकरण दाबत आहे. या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी आम्ही लढणार आहोत. यात ज्यांची नावे आली आहेत त्यांची नार्को टेस्ट करून सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी तृत्पी देसाई यांनी केली आहे.

तृत्पी देसाई यांनी परळी येथील वसंत नगर तांडा येथे पूजाच्या नातेवाईकांची भेट देऊन त्यांचे सांत्वन करून विचारपूस केली. ‘आपण पूजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, पालकांची तक्रार नसली, तरी जे काही पुरावे पुढे येत आहेत त्यावरून पोलिसांनी कारवाई करावी. या प्रकरणात राज्यातील मंत्र्यांचे नाव येत आहे. यामुळे त्यांना आणि सत्तेला वाचविण्याचा प्रयत्न करत सरकार प्रकरण दाबत आहे.

एखादा मंत्री गायब कसा काय होऊ शकतो. या प्रकरणातील दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत. संबंधित लोकांची नार्को टेस्ट करून सत्य बाहेर आणण्यासाठी सीबीआय चौकशी करावी’, असं देसाई यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!