Share

हिमंता बिस्वा शर्मांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना चांगल्या उपचाराची गरज- नाना पटोले

Published On: 

मुंबई : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा(Himanta Biswa Sarma) यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामनेही बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर हिमंत बिस्वा शर्मांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना चांगल्या उपचाराची गरज असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी केले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नाना पटोले म्हणाले की,‘शर्मा यांचे वक्तव्य अत्यंत अश्लाघ्य व सर्व मर्यादा पार करणारे असून राहुल गांधी यांच्यासंदर्भात त्यांनी केलेले वक्तव्य त्यांची पातळी दाखवून देते. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांपासून सगळ्याच नेत्यांना विरोधकांवर अशी वैयक्तिक टीका करुन त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा रोग जडला आहे. त्यांची हीच संस्कृती आहे परंतु काँग्रेसची अशी संस्कृती नाही’, असे पटोले म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांना पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईक बद्दल पुरावा हवा होता. मात्र आम्ही त्यांना तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा विचारला आहे का? जर आमच्या सैनिकांनी स्ट्राइक केल्याचे सांगितले असेल, तर तुम्हाला पुरावे मागण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल हिमंता बिस्वा शर्मा यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!