बंगळुरू : IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने वानिंदू हसरंगाची १०.७५ कोटी मध्ये निवड केलीआहे. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हसरंगला खरेदी करण्यासाठी मोठी चढाओढ दिसली. वानिंदू हसरंगाची बेस्ट प्राईस १ कोटी रुपये इतकी होती.
गेल्या हंगमात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून बदली खेळाडू म्हणून खेळला होता. श्रीलंकेच्या खेळाडूला आयपीएलमध्ये आतापर्यंतचा अनुभव फारच कमी आहे. तो टी २० फॉरमॅटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे . ज्यामुळे त्याला आयपीएलमध्ये खूप मागणी आहे. हेच कारण असावे कि त्याला त्याच्या बेस प्राईस पेक्षा नऊपट किंमत या मेगा ऑक्शनमध्ये मिळाली आहे.
जुलै २०२१ मध्ये भारताच्या श्रीलंका दौऱ्यात, भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर वानिंदू हसरंगाने प्रसिद्धी मिळवली होती. त्याने त्याच्या संघासाठी टी २० मालिका २-१ ने जिंकण्यामध्ये आघाडीची भूमिका बजावली होती.
महत्वाच्या बातम्या
- “आम्ही एकदाही घोड्यावर…”; खासदाराचे १८ वर्षाच्या मुलीसोबत तिसऱ्यांदा लग्न, सिंगल लोक हैराण
- अजित पवार यांनी सांगितली कोरोना काळातली आठवण; म्हणाले…
- IPL Auction 2022 : इंग्लंडचा ‘रॉय’ बनला गुजरातचा ‘टायटन’
- IPL Auction 2022 : सुरेश रैना पहिल्या फेरीत अनसोल्ड!
- प्रशांत किशोर आणि तृणमूल काँग्रेस मधील वाद चिघळला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

